येस न्युज मराठी : क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट, फ्लॅटस्, रो हाऊझेस् इत्यादीचे प्रदर्शन यंदा दि. २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी स. १०.३० वा. कोठारी पाईप्स्चे व्यवस्थापकीय संचालक उज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनिल फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सोमवार 4 फेब्रुवारी पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे कोठारी प्ल्मबींग पाईप्स् हे मुख्य प्रायोजक असून एचडीएफसी बैंक हे बँकींग पार्टनर तर कालीका स्टील हे स्टील पार्टनर आहेत.
यंदाच्या प्रदर्शनात सुमार ७० स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्, फ्लॅटस्, बंगलोज, रो-हाऊसेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक बिल्डींग मटेरियल सप्लायस, वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. याप्रदर्शनात रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर ही आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.
करणारी बांधकाम व्यवसायिकाची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर, कामगारांसाठी विविध शिबीरांसह वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली.
वुमन्स विंग व यूथ विंग क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण, शैक्षणिक दौरा, सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
पत्रकार परिषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंखे, सचिव संतोष सुरवसे, खजिनदार राजीव दिपाली, प्रदर्शनाचे को कन्व्हीनगर विरल उदेशी, माजी अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी, समीर गांधी, नंदकुमार मुंदडा,संकेत थोबडे आदी उपस्थित होते.