सोलापूर – नऊ थीम यशस्वी करणे साठी शाश्वत विकास आराखडे तयार कराअसे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षाचे विकास आराखडे तयार करणेचे प्रशिक्षणाचे आयोजन डाळींब संशोधन केंद्रात करणेत आले होते. या दोन दिवशीच प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, यांचे सह सर्व गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. ग्राम स्वराज्य अंतर्गत शाश्वत विकास आराखडावर आधारित कॅलेंडर चे प्रकाशन सिईओ मनिषा आव्हाळे व विभाग प्रमुख यांचे हस्ते करणेत आले. सिईओ मनिषा आव्हाळे म्हणाल्या, शाश्वत विकास करताना ज्यांचे साठी आपण करत आहोत त्यांची भागीदारी महत्वाची आहे. आराखडे करणे हा विषय नवीन नाही परंतू एकत्रित येऊन चर्चा करा. पंधरावा वित्त आयोग बरोबर ग्राम निधी व इतर योजनांची सांगड घाला.
स्वप्ने पहायला कशाची भिती….?
विकासासाठी आपण सर्वजण आहोत. विकास असला पाहिजे. सर्वानी आपल्यात धमक ठेवा. उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करा. माझे बाबांना लोक वेड्यात काढायचे..! ज्या गावात मुलींना शिकवीत नाहीत त्या ती मुलगी कलेक्टर कशी होणार ? पण मी जिद्द सोडली नाही. रिझल्ट येई पर्यंत मला विश्वास नव्हता. पण मी आयएएस झाले. स्वप्ने पहा. स्वच मध्ये धमक ठेवा. असे सांगून आपल्या जीवनातील कठीण प्रसंग सांगून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आंतरमुख केले.
प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले. १५ वा वित्त आयोगाचे संयोगिकरण विविध योजनांशी निगडीत आहे. या सर्व संयोगिकरणाची माहिती व्हावी. नऊ थीम च्या दृष्ट्रूीने नियोजन करायचे आहे. राज्य पातळी वर ज्यांनी काम केले आहे त्यांचे व्हीडीओ व माहिती देणेत येत आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
या बाबत बोलताना प्रविण प्रशिक्षक हनुमंत कादे म्हणाले, मानवी संसधाने व मनुष्यबळाचा वापर करून आराखडे तयार करायचे आहेत. मानव विकास निर्देशांक वाढविणेसाठी आपणा सर्वांना आपण प्रयत्न करायचे आहेत. जिल्हा परिषद नियोजन समिती आपणांस स्थापन करायवायाची आहेत. संसाधनाचा उपयोग करून विकासात्मक फायदे काय आहेत हे पाहिले पाहिजे. असेगी कादे यांनी सांगितले. सुत्रसंचालन प्रविण प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिंचन जाधव यांनी आभार मानले. या प्रशिक्षणात प्रविण प्रशिक्षक म्हणून सुनंदा राजेगावकर, हनुमंत कांदे, संतोष शिंदे, राजेंद्र वारगड, भिमाशंकर तुळजापूरे, दत्तात्रय पाटील यांनी काम पाहिले.