नऊ तालुक्यांमध्ये ५० पेक्षा कमी नवे रुग्ण
सोलापूर : जिल्ह्याचा १० जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात ३६३ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे या कालावधीत ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या जिल्ह्यामध्ये ३,१५१ आहे. कोरोना बाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात नवीन १०२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपूर तालुक्यात नवीन ७२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरित ९ तालुक्यांमध्ये ५० पेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत.