येस न्युज मराठी नेटवर्क: सोलापूर शहरातील कोविड-19 चा ६ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने १८० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे . बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात १५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे या कालावधीत रुग्णालयातून घरी परतणार यांची संख्या ३२८ आहे. सोलापुरातील प्रभागनिहाय रुग्ण संख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये ३३ , प्रभाग क्रमांक २३ मध्ये १५, प्रभाग क्रमांक १५ व ७ मध्ये प्रत्येकी १३, प्रभाग क्रमांक ६ मध्ये ११ आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये १२ असे रुग्ण नव्याने आढळले आहेत. १५ मृत्यूंपैकी विजापूर रोड येथील दोंदेनगर मध्ये राहणाऱ्या ४० वर्षाच्या व्यक्तीचा तसेच आदित्यनगर येथील ४० वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे . जुळे सोलापूर येथील प्रेमनगर मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षाच्या व्यक्तीचा देखील करणामुळे मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.