येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची संख्या मंगळवारी आलेल्या अहवालानुसार १०९१ होती. यामध्ये ६३० पुरुष आणि ४६१ महिलांचा समावेश आहे. चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे .
त्यापैकी अकरा पुरुष आणि ७ महिला आहेत या २४ तासात कोरणा मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ६२९ आहे बार्शी करमाळा माढा माळशिरस आणि पंढरपूर या ५ तालुक्यात शंभरावर नवीन रुग्ण २४ तासात आढळले आहेत. बार्शी ते १२६, करमाळा ११७ माढा १९८, माळशिरस १८७ आणि पंढरपूर मध्ये १७४ नवीन कोरोनाबाधित सापडल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संचारबंदी लागू करून पाच दिवस झाले तरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले आहेत. जिल्ह्यातील नागरी भागामध्ये १९७ आणि ग्रामीण भागांमध्ये ८९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यामधील ७७५५ रुग्णांवर विविध रुग्णालयात कोरोनाचे उपचार चालू आहेत. २४ तासात मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांचा विचार केला तर एकट्या करमाळा तालुक्यात ५, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, आणि पंढरपूर तालुक्यात ४ व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.