• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगसाठी महावितरणकडून सोलापुरात दोन चार्जिंग स्टेशनची उभारणी

by Yes News Marathi
March 14, 2023
in मुख्य बातमी
0
इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगसाठी महावितरणकडून सोलापुरात दोन चार्जिंग स्टेशनची उभारणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सोलापूर – ई-व्हेईकलची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोलापूर शहरात दोन हजार १०२ तर ग्रामीणमध्ये ८०३ इलेक्ट्रिक व्हेईकल रस्त्यावर धावत आहेत. त्याची नोंदणी ‘आरटीओ’कडे झाली आहे. पण, त्या वाहनांच्या शास्त्रोक्त चार्जिंगसाठी सोलापूर जिल्ह्यात व्यवस्थाच नाही. ही गरज ओळखून ‘महावितरण’ने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर व अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले असून एप्रिलमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.
  • प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करीत केंद्र सरकारने नवीन धोरण आणले आहे. १५ वर्षांवरील शासकीय वाहने आता ३१ मार्चपूर्वी भंगारात काढली जाणार आहेत. तर खासगी वाहनांना २० वर्षांची मुदत असणार आहे, पण त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तत्पूर्वी, इंधनासाठी परकीय देशावर अवलंबून राहावे लागते आणि वाहनांच्या अमर्याद संख्येमुळे इंधनाचा खपदेखील भरमसाट वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-व्हेईकलला प्रोत्साहन दिले आहे.
  • त्यानुसार, ताशी २५ कि.मी.पेक्षा कमी वेग असलेल्या वाहनांची नोंदणी ‘आरटीओ’कडे करण्याची गरजच नाही. ताशी २५ कि.मी.पेक्षा अधिक वेग असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी मात्र बंधनकारक आहे. त्याअंतर्गत सोलापूर शहरात दोन हजार १०० दुचाकी, ७० तीनचाकी आणि ४६ चारचाकी आहेत. तर ग्रामीणमध्ये ७८९ इलेक्ट्रिक दुचाकी आणि १४ चारचाकी आहेत. ‘महावितरण’ने उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर पहिल्यांदा चारचाकी वाहनांची सोय असणार आहे. आणखी दोन चार्जिंग स्टेशन सोलापूरसाठी मंजूर असून त्याठिकाणी दुचाकी व तीनचाकीची सोय केली जाणार आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘महावितरण’तर्फे जुळे सोलापूर व एमआयडीसी येथील आमच्या सबस्टेशन परिसरातच दोन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत. पुढील महिन्यात त्याचा शुभारंभ होईल. पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहनांची सोय त्याठिकाणी केली असून एकावेळीच तीन गाड्यांचे चार्जिंग होईल, अशी व्यवस्था त्याठिकाणी असेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर संतोष सांगळे यांनी दिली आहे.
  • चार्जिंग स्टेशनसंदर्भातील ठळक बाबी…

⧫ एकावेळी तीन वाहनांचे होऊ शकते चार्जिंग
⧫ अर्ध्या तासात वाहनाचे चार्जिंग पूर्ण होण्याची व्यवस्था
⧫ प्रतियुनिट साधारणतः: ११.१२ रुपयांचा खर्च; सर्व्हिस चार्ज तीन रुपये
⧫ युनिटप्रमाणे ऑनलाइनच पैसे भरावे लागणार; त्यानंतरच वाहन पुढे नेता येते

  • जिल्ह्यातील ई-व्हेईकलची स्थिती

⧫ दुचाकी – २,८८९
⧫ तीनचाकी – ७२
⧫ चारचाकी – ६०
⧫ एकूण – ३,०२१

Previous Post

प्राजक्ता माळीचे लेटेस्ट साडी फोटोशूट!

Next Post

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनांनी संप मागे घेण्याची केली घोषणा

Next Post
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनांनी संप मागे घेण्याची केली घोषणा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनांनी संप मागे घेण्याची केली घोषणा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group