• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, March 10, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देसाईनगर येथे 20 एमएलडी क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात;महापौर विनायक कोंड्याल यांच्या कडून पाहणी…

by Yes News Marathi
March 10, 2026
in इतर घडामोडी
0
देसाईनगर येथे 20 एमएलडी क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात;महापौर विनायक कोंड्याल यांच्या कडून पाहणी…
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या अमृत-१ योजनेअंतर्गत देसाई नगर येथे 20 एमएलडी क्षमतेचे अत्याधुनिक मलनिसारण प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या प्रकल्पाची महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रकल्पामध्ये शहरातील सांडपाण्याची वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करण्याचा उद्देश आहे. सद्यस्थितीत मलनिसारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या टाक्या, प्रायमरी सेंट्रीफ्युज युनिट, क्लोरीन युनिट, ब्लोअर रूम आदी महत्वाच्या कामांची पूर्तता मक्तेदार दास ऑफशोर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

तसेच मलनिसारण केंद्रामध्ये येणारे सांडपाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेले पंप हाऊस व त्यास लागणारी वीज यंत्रणा उभारण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. यामध्ये ट्रान्सफॉर्मर, डिझेल जनरेटर, मेकॅनिकल स्क्रीन, इलेक्ट्रिक क्रेन, एचडी पॅनल आदी यंत्रणांचा समावेश असून हे काम मक्तेदार सुहास इलेक्ट्रिकल यांच्या मार्फत करण्यात आले आहे.दरम्यान, मलनिसारण केंद्र सुरळीतपणे चालविण्यासाठी आवश्यक असलेली ११ केव्ही विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कडून मिळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रकल्पाच्या पाहणीवेळी माननीय महापौर विनायक कोंड्याल ,आयुक्त, डॉ सचिन ओम्बासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,नगरसेवक शिवाजी वाघमोडे,नगरसेवक व्यकटेश कोंडी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक सात्विक बडवे, यांच्यासह सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, सहाय्यक अभियंता नितीन आंबीगार, रामचंद्र पेंटर, झोन अधिकारी नंदकुमार जगदाणी उपस्थित होते.तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उपअभियंता राजकुमार आवळे, शाखा अभियंता एम. हरीश, अभियंता कासिम नदाफ यांनीही उपस्थित राहून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती दिली.यावेळी मान्यवरांनी कामांची पाहणी करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊन पर्यावरण संवर्धनासह नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

कुणी बस शेड बांधून देता का..बस शेड…! SMT

Next Post

मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार…!

Next Post

मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In