सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर यांचे संयुक्त विदयमाने “हृदय श्वसन पुर्नजीवन प्रात्यक्षिक कार्यशाळा.” नियोजन भवन सोलापूर येथे दि. ०४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.शब्बीर अहेमद औटी हे होते. उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सोलापूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूरचे अध्यक्ष डॉ. गुरूनाथ वच्छे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर कायदेविषयक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधीलकी जाणत मानवी जीवनाचे मुल्ये अधोरेखित करत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. मानवी जीवनाचे मुल्ये हे निश्चितच मौल्यवान असून, अकस्मातरित्या हृदयविकाराचा धक्का किंवा ग्लानी येवून एखादी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य किंवा सार्वजनीक ठिकाणी अशी व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ करावयाचे उपाययोजना याबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.
“जान है तो जहान है” या पंक्तीसह कार्यशाळेचे महत्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष. डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी अध्यक्षीय समारोपात विषद केले. त्यांनी वैयक्तीक कौटुंबीक अनुभव सांगत जीवरक्षक होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आणिबाणीच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या आयोजनातून जीवरक्षक तयार होतील. आणि त्या परिस्थितीवर मात करुन संबंधीत व्यक्तीस जीवनदान तथा हृदय श्वसन पुर्नरजीवीत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे सचिव श्री. नरेंद्र जोशी यांनी कार्यशाळा आयोजनाबाबतची भूमिका विषद केली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर कायदेविषयक जनजागृती सोबत सामाजीक बांधीलकी जपत मानवी जीवन अमूल्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी. दिलीप स्वामी यांनी अशा प्रकारची कार्यशाळेचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गुरुनाथ वच्छे आणि डॉ.पुष्पा अग्रवाल, डॉ. कैलास वाघमारे यांनी सी.पी.आर. आणि हृदय श्वसन पुर्नजीवन कशा पध्दतीने करावयाचे यावर मार्गदर्शन केले. ज्याव्दारे एखादया व्यक्तीस आवश्यक ती वैदकीय सेवा उपलब्ध होईपर्यत त्यास दयावयाची मदत आणि त्यांच्या जीवनाचे रक्षण कशा पध्दतीने करता येउ शकते याबाबत प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले.
मानवीजीव हा वाचवता येईल आणि त्यास जीवनदान प्राप्त होईल. सी.पी.आर प्रणालीबाबत या कार्यशाळेत विस्तृतपणे दृश्यव गीत-संगीताच्या माध्यमातून देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी प्रात्यक्षिकात प्रत्यक्ष सहभागी होऊन अशा आणिबाणीच्या प्रसंगी योग्यपावले उचलण्याबाबतची माहिती प्राप्त केली.
सदरील कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच हि कार्यशाळा झुम मिंटीग व फेसबुकव्दारे थेट प्रक्षेतीत करण्यात आली. त्याचा लाभ तालूका, जिल्हयातील न्यायीक अधिकारी, कर्मचारी व फेसबुक समाज माध्यमाव्दारे अनेकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुधांशु कोठाडीया यांनी केले. या कार्यशाळेसाठी अॅड. सार्थक चिवरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.