सोलापूर : प्रभाग २४ जुळे सोलापूर भागातील स्नेहल पार्क येथिल सिमेंट काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. नगरसेविका संगीता जाधव यांच्या भांडवली निधीतील 8 लाख 85 हजार रुपये खर्चून हा रस्ता करण्यात येणार आहे.

या कामाच्या शुभारंभाप्रसंगी या भागातील वरद महावीर दुरुगकर याची भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सहाय्यक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सावकारे, शशिकांत रणशृंगारे, शिवानंद चिनगुंडे, रमेश माने, डॉ. संजय कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, कोल्हापुरे, रिया हुंडेकरी, प्रज्ञा जोशी, शिवशरण, खुबा, कडले, श्रीकांत शिवशरण, सावळे, धैर्यशील उत्पात, रविकांत व्हनकोळे, प्रारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश जाधव, शिवराज भोसले, प्रवीण इरकशेट्टी नगरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.