येस न्युज नेटवर्क : नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्यांनी देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली तरी उपचारादरम्यान केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.