दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख ऐवजी कोणताही भूमिपुत्र उमेदवार द्या आणि त्याला निवडून देऊ. या मागणीसाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते श्रीशैल मामा हत्तुरे, मळसिद्ध मुंगळे दक्षिण तालूका भाजपा उपाध्यक्ष,अप्पू पाटील बिराजदार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,श्रीनिवास करली सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका, श्रीनिवास पुरुड नगरसेवक, अनिल चव्हाण, सचिन चव्हाण संचालक बंजारा समाज तांडा सुधार योजना, अशोक पाटील बिराजदार, वैभव हत्तुरे नगरसेवक सोमपा व दक्षिण तालुक्यातील पाच ते सहा सरपंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
विद्यमान आमदारांचा बद्दल असणारी नाराजी व्यक्त केल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वे लावू असे आश्वासन दिले.