सोलापूर :- जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांची सभा आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सोलापूर येथे पार पडली.
यावेळी शासकीय सेवेत असताना निधन पावलेल्या सात जणांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीपत्र शंभरकर यांच्या हस्ते देण्यात आले. श्रीकांत वाघमारे, रेखा गायकवाड, विश्वनाथ झगळघंटे, विठ्ठल बोमणे, पद्मलता यादव, नौशाद शेख, दत्त्तात्रय कोळेकर या गट ड च्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. तसेच सर्वांनी चांगले काम करावे , अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी उदमले, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब तुपसमिंदर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी सोलापूर हेमंत निकम, तहसीलदार स्वप्निल रावडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, निवडणूक तहसीलदार अमरदिप वाकडे, तहसीलदार करमाळा समीर माने, अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब सिरसट, तहसीलदार सांगोला अभिजीत पाटील, तहसीलदार माळशिरस जगदिश निंबाळकर, तहसीलदार बार्शी सुनिल शेरखाने तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना 104 लॅपटॉप वाटप करावयाचे आहेत. आज प्रातिनिधिक स्वरुपात अजय जैसवाल, तलाठी कुसुर, ता. अपर तहसिल मंद्रुप, आरती देशमुख तलाठी शहर, ता. उत्तर सोलापूर, संतोष कांबळे, मंडळ अधिकारी वागदरी, ता. अक्कलकोट, मुशीर हकीम, तलाठी, सावळेश्वर, ता. मोहोळ, ज्ञानोबा माळी, मंडळ अधिकारी वाघोली, ता. मोहोळ यांना लॅपटॉप वितरीत करण्यात आले.
