येस न्युज मराठी नेटवर्क : दोन वर्षातच रस्ते खराब, रस्त्यावर ड्रेनेज लाईन, मेनहोल खराब, काही ठिकाणी मेनहोल खाली-वर झाले आहेत. ही कामे गॅरंडी परीएडमध्ये असल्याने मक्तेदारांकडून करुन घेणे, अन्यथा त्यांच्याकडून सुरक्षित व बयाणा रक्कम जप्त करुन घेणे असे मुद्दे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, महापालिकेचे माजी सभागृहनेता जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांच्या जनसंवादमध्ये जनतेंनी मांडले.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापालिकेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, रेशन धान्य माल मिळत नाही, अपंग व विधवा महिलांना वेळेवर निराधार व कुटुंब योजनेतून व श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आमदारांना सांगून योजनेतून पैसे मिळवून द्या, अशा मागण्या समस्याग्रस्त नागरिकांनी जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांच्याकडे केल्या.
प्रभाग क्र 3, घोगडे वस्ती, जय भवानी नवरात्रोत्सव व क्रीडा मंडळ येथे ‘जनसेवक सुरेशअण्णा पाटील आपल्या दारी, आपल्या देवी मंदिर समोर’ या उपक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेतला यावेळी नागरिकांनी तक्रारी मांडल्या. झाडू मारणारे कर्मचारी आठवड्यातून दोन ते तीन दिवस झाडू मारतात. बाकीच्या दिवशी झाडलाट होत नाही. रस्त्यावर कचरा पडून अनेक ठिकाणी कचरा, आजोरा, माती रस्त्यावर अनेक ठिकाणी मध्यभागी पडली आहे. याचे ढिगारे रचले आहेत. ते त्वरित काढणे, मोकाट कुत्र्यांचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे. कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला असून, ते घाणही करत आहेत. कर आकारणी, दंड, व्याज, शास्ती, नोटीस फी, वॉरंट फी, सफाईपट्टी, इतर करमलनिस्सारण कर भरुनही घंटागाडी घरोघरी येत नाही, कचरा उचलला जात नाही. या पैशाची घनकचरा विभाग उधळपट्टी करून अधिकार्यांचे पगार भागवत आहे. कर रुपात घेतलेल्या पैशांतून आम्हाला सेवा द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. अनियमित पाणीपुरवठा, बोअर, हातपंप, इलेक्ट्रिक पम्प बंद आहेत. या सगळ्या बोजवारा उडालेल्या कामाची पाहणी करा, नागरिकांना सुविधा द्या, पाणीचोरांवर आळा घाला, हॉटेल व्यावसायिकांचे बोअर पाईपलाईन कट्ट करा, लाईन बंद करा, गरजंत गरिबांना पाणी द्या, अशा मागण्या नागरिकांनी सुरेशअण्णा पाटील यांच्याकडे केल्या.
गिरप्पा यांनी झाडाचे फांदी, फुटपाथ घालून देण्याची तर नरसिया पोगूल निर्मल विद्यामंदिर येथे कचरा साचून राहतो व शहा डॉक्टर यांच्या घरातून पाणी बाहेर सोडतात, अशी तक्रार केली. शारदा माळस यांनी मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याची मागणी केली. नागम्मा पारेली यांनी निराधार योजनेचा व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावे व डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली. नागमणी इंद्रा यांनी महावीर जैन रेशन दुकानामधून धान्य मिळत नाही, मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्यात यावे व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून द्यावा, बालमणी रायनी यांनी अपंगाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. कलावती रायनी यांनी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली. अर्चना दोंतुल यांनी घरासमोर स्पीड ब्रेकर घालून देण्यात यावे, अशी मागणी केली तर अशोक शेट्टी ड्रेनेज लाईन व्यवस्थित साफ करत नाहीत. पैसे मागतात. पैसे घेऊन काम व्यवस्थित करत नाही अशी तक्रार केली. संदीप महाले जुनागर यांनीही समस्या मांडली तर दत्तात्रय मॅडम यांनी पिण्याचे पाणी जास्त मिळत नाही. जुना कनेक्शन कट करून नवीन कनेक्शन जोडून देण्याची मागणी केली. गिरप्पा दुकान जवळील बोअर कलेक्शन करून देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली.
नीता रानसर्जे यांनी बोअर, झाडू मारणारे येत नाहीत, कुत्र्यांचा त्रास वाढलाय, महेश पवार यांनी दमाणी शाळेत अॅडमिशन मिळवून देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विजयलक्ष्मी वल्ला यांनी घंटागाडी वेळेवर येत नाही. वेळेवर येण्यासाठी ताकीद द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. रूपा दुस्सा यांनी दहावी-बारावी कास्ट सर्टिफिकेट काढण्याकरिता महा ई सेवा केंद्र पैसे भरपूर घेत आहेत. शिबिर घेऊन त्या विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी करत लहान लेकरांना बालोद्यान करून देण्यात यावे, असे सांगितले. दुधनीकर यांनी कुंभार वेस भागामध्ये दुकान असल्याने अतिक्रमण आहे, असे सांगून दुकान काढण्यास दमदाटी करत आहेत. त्या अधिकारी वर्गांना पावती करा म्हणून विनंती केली तरी करत नाहीत, अशी तक्रार केली. स्वामी काका यांनी मातीचे ढिगारे काढण्याचे तर अंबादास बोडा यांनी मुलींच्या लग्नासाठी मदत करण्याची मागणी केली. बालमणी रायनी यांनी पंतप्रधान योजनेतून सरकारी घर देण्याची अपेक्षा व्यक्त केली तर ईश्वरअम्मा दासरी यांनी आडम मास्तरांकडे पैसे, फॉर्म भरुन देऊनही घर मिळत नसल्याची तक्रार केली. अर्चना दोंतुल यांनी शिलाई मशीन तर बत्तुल मामा यांनी बंद बोअर दुरुस्त करा आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
नीता रानसर्जे, रत्ना भूमकर, महेश पवार, विजयालक्ष्मी वल्लाल, रूपा दुस्सा, दुधनीकर, गिरप्पा गणपा, नरसय्या पोगुल, शारदा म्हाळसा, नागम्मा परेल्ली, नागामणी इंद्रा, बलमणी रायनी, कलावती रायनी, अर्चना दोंतूल, अशोक शेट्टी, संदीप महाले, स्वामी काका, अंबादास बोडा, ईश्वरम्मा दासरी, बत्तुल मामी, संजय जळणापुरे यांनी जनसंवाद कार्यक्रममध्ये जनतेने प्रश्न उस्थित केले. संजय जालनापुरे यांनी सरकारी बोअरचा वापर वैयक्तिक करण्यात येत आहे. त्यातून पाणी सगळ्यांना देण्याची मागणी केली. गोपाल कोडम, जाजू शेठजी, अशोक चिल्का, लिंग्या स्वामी, मल्लिनाथ साखरे, नागनाथ ताटी, नंदकुमार सिंगराल, बाळू बल्लाळ, राजू गुंडला, बालाजी रानसर्जे, नागेश दोंतूल, रवि दासरी, गिरप्पा मालक, प्रजा शेठ, प्रभाकर बोगी, श्रीकार येमूल, प्रणव दोंतूल, विश्वनाथ भावी, यल्लपा करली, युवानेते बिपीन पाटील, हिदूंश्री संदीप महाले, प्रशांत कलशेट्टी, देवराज पाटील, विजय कोळी यांनी जनसंवादसाठी परिश्रम घेतले.