येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्कच्या माध्यमातून सम्राट चौक परिसरातील महाबोधी चौकात “१४ ते २० नोव्हेंबर बाल दिन सप्ताह” अंतर्गतच्या शेवट दिवशी स्थानिक मुलांना चाईल्ड लाईन १०९८ व बाल हक्क-अधिकाराबद्दलची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील मुला-मुलींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम डेस्कच्या संचालिका सपना चिट्टे आणि डेस्कचे समन्वयक मल्लिनाथ तमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चाईल्ड हेल्प डेस्कचे टीम-मेंबर अनोज कदम, विश्वेश्वर वाघमारे, विनय व्हटकर, वैशाली बाळशंकर यांनी परिश्रम घेतले. तसेच सामाजिक कार्यकर्ते अक्षय जेटीथोर, संघपाल भांगे, संकेत कसबे, सुजित शेंडगे, रोहित मोरे, सुदर्शन सरवदे, ऋतिक वाघमारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांना खाऊ वाटण्यात आले.