आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वर्धापन दिनानिमित्त गर्दी
सोलापूर : : भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र भाजपाच्यावतीने दीड कोटी सदस्यांची नोंदणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नु यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, डॉ. राजेश अणगिरे, अनिल पल्ली, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, मधुकर वडनाल, अंबादास कुरगुळे, सुनील पाताळे, मध्यपश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम, महिला मोर्चा शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, सुनीता कामाठी, बजरंग कुलकर्णी, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, दत्ता पाटील, यशवंत पाथरूट, रविकांत कोळेकर, मारेप्पा कंपल्ली, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.