No Result
View All Result
- शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.
- जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होत असल्याचा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत केला होता. विशेष म्हणजे असेच काही चित्र आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात रणशिंग फुकणार आहेत. त्याच संभाजीनगरमधून एकन शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याचा मैदानावर एकनाथ शिंदे यांची ‘धनुष्यबाण यात्रे’ची सभा होणार आहे. तर आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
No Result
View All Result