बाल शिवछत्रपती व हिराने, आपल्या तान्ह्या बाळासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरून पराक्रम गाजवला या नाटीकेने वेधले लक्ष
सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मूराराजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या शिवभक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम प्रमुख पाहुणे मुख्य संपादक प्रशांत माने डॉ.राधिकाताई चिलका, यांच्या हस्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा पालक शिक्षक संघाचे अध्यक्षा शोभा कुलकर्णी, इस्माईल बागवान सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे, स्व. राजेश अण्णा कोठे, स्व.महेश अण्णा कोठे ,देवी सरस्वती ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर शिवजयंती च्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यानंतर शाळेतली प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यानी बाल शिवाजी ही नाटिका वेशभूषेसह, तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यानी हिरकणीची कथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका धाडसी मातेची सत्यकथा आहे.
रायगडावर दूध विकण्यासाठी जाणाऱ्या हिरा गवळणीचे बाळ पायथ्याशी होते. सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झाल्यामुळे अडकून पडलेल्या हिराने, आपल्या तान्ह्या बाळासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरून पराक्रम गाजवला. तिचे हे अफाट मातृप्रेम व धाडस पाहून महाराजांनी तिला सन्मानित केले आणि त्या कड्याला “हिरकणी बुरूज” नाव दिले. सदर नाटीका ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकाने नी सदर दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त करतना म्हणाले शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला, ज्याने महाराष्ट्राच्या मातीतील पारतंत्र्याचा अंधार कायमचा दूर केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे किंवा सम्राट नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक, अर्थतज्ञ आणि खऱ्या अर्थाने ‘प्रजाहितदक्ष’ राजा होते. आजच्या आधुनिक काळातही महाराजांचे विचार तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत. या नंतर पोवडा , शिवगर्जना घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे उपाध्यक्ष आमदारदेवेंद्र दादा कोठे,सचिव प्रथमेश दादा कोठे, डॉ.राधिका चिलका, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सदर शिवजयंती यशस्वी करण्यासाठी शाळेतील इतिहास शिक्षिका सरस्वती जवळकर व मंगल जाधव,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





