बिविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
सोलापूर : स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शकाची गरज असते. स्पर्धेतील सहभागासोबत यशाचा दावेदार होण्यासाठी विद्यार्थ्याची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकाचे मार्गदर्शश याचा समतोल असणे गरजेचे असते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा जपणारा चाटे शिक्षण समूह विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभाचे काम करतो, असे उद्गार शिवछत्रपती रंगभवन याठिकाणी झालेल्या ‘झेप यशाची’ या शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा.डॉ. भारत खराटे यांनी काढले.
“झेप यशाची” या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज, सोलापूरचे प्राचार्य डॉ शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधींचा विचार करून आत्तापासून स्पर्धा परीक्षा आणि नवनवीन ज्ञानासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आजचा अभ्यास व्यवस्थित समजून घेतला आणि त्याचे आकलन केले तर भविष्यातील स्पर्धेची चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले.
यस न्युज, मराठी यु-ट्युब चॅनेलचे संचालक मा. शिवाजी सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नवीन शैक्षणिक प्रवाहाचा विचार करून स्वत:मध्ये कौशल्य विकास आणि नवबोपक्रमाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. चाटे शिक्षण समुहाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेरव राऊत यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विषद करताना सांगितले, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची झेप घेत असताना आतापासूनच त्याची पायाभरणी आवश्यक आहे. या पॅटर्ननुसार आजवर चाटे शिक्षण समुहाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमावेळी नंदिनी शिंपाळे, तेजस्वीनी ननवरे व जमील शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चाटे शिक्षण समुहाची कार्यपद्धती उत्कृष्ट असून यशाची झेप घेण्यासाठी आत्मविश्वास मिळतो असे सांगितले. सोबतच बीटीएस-२०२३, डॉ. होमीभाभा, एनएमएमएस व इतर स्कॉलरशीप परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रा. सतिश काळे, प्रा. रमेश भोजने, डॉ. विनोद खरात, मा. अरूण कोकरे आणि चाटे समुहाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.