सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शनिवारी मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा साजरा झाला. यानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पहाटे चारपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. याअंतर्गत महर्षी मार्कंडेय अभिषेक महापूजा आदित्य कोंगारी, चंडीयाग, नवग्रह पूजन रंजीत गड्डम, पुष्पा इप्पलपल्ली तर भृगुमहर्षी अभिषेक महापूजा सिद्धेश्वर पुलगम यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरावर पद्मध्वजारोहण पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष श्रीनिवास म्याडम, सचिव आत्माराम चिप्पा, मार्कंडेय मंदिराचे अर्चक राघवेंद्र आरकाल आदींच्या सहकार्याने धार्मिक विधी पार पडले.
कोकणी लोक जसे नारळी पौर्णिमा साजरी करतात, त्या धर्तीवर पद्मशाली बांधव नुलुपुन्नमी साजरी करतात. नुलु म्हणजे सूत आणि पुन्नमी म्हणजे पौर्णिमा. पद्मशाली हे विणकर असल्याने या पौर्णिमेरोजी सुताची पूजा करतात. कापसाच्या राख्या तसेच जानवे परिधान करतात. मार्कंडेय मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पद्मशाली बांधवांची मांदियाळी दिसून आली. ‘जय मार्कंडेय…’ चा अखंड जयघोष सुरू होता.दर्शन घेतल्यावर भक्तगणांनी मंदिरातील पहिल्या मजल्यावर पुरोहितांकडून जानवे धारण करतानाच कापसाच्या राख्याही बांधून घेतल्या.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंदिरापासून रथाची पूजा सुदर्शन गुंडला यांच्या हस्ते तर मिरवणुकीचा प्रारंभ पोलिस आयुक्त एम. राजकुमार, आ. देवेंद्र कोठे, मध्यप्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परकीपंडला, तेलगू अभिनेता व जनसेना पक्षाचे प्रचार समिती अध्यक्ष आर. के. सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव संतोष सोमा, विश्वस्त जनार्दन कारमपुरी, रामकृष्ण कोड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम आदी उपस्थित होते. दरम्यान रथाचे विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे सालाबादप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली आणि मान्यवरांच्या सत्कार करून रथाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, रिजवान शेख, शोएब चौधरी, रिजवान पैलवान रिझवान दंडोती, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी , रुस्तुम शेख, लक्ष्मण भोसले, तनवीर शेख, हारिस शेख, मुबीन शेख, बाबा शेख, सरफराज शेख, हुजेर बागवान , कय्युम मोहळकर, अफ्फान बागवान काशीफ बेलीफ, इरफान बावा, गफूर चौधरी, मोहसीन नदाफ सरफराज काझी आदी उपस्थित होते.






