आधी जाहीर केलेल्या ९४४ विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणखी १८२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या पूजा, दिवाळी व छठ उत्सवानिमित्त अतिरिक्त १८२ विशेष गाड्या चालविणार आहे.
मध्य रेल्वेद्वारे दिवाळी/छठ पूजा निमित्त चालवल्या जाणाऱ्या एकूण विशेष गाड्या ११२६ आहेत, त्यापैकी १८२ अतिरिक्त विशेष गाड्या आता जाहीर करण्यात आल्या आहेत आणि ९४४ विशेष गाड्या यापूर्वी जाहीर केल्या होत्या.
अतिरिक्त १८२ विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
1) लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (४० सेवा)
01017 द्विसाप्ताहिक विशेष २७.०९.२०२५ ते ०१.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. (२० सेवा)
01018 द्विसाप्ताहिक विशेष २९.०९.२०२५ ते ०३.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक सोमवार व बुधवारी दानापूर येथून ००.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. (२० सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपूर, सुभेदारगंज, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर कार.
2) लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (४० सेवा)
01123 द्विसाप्ताहिक विशेष २६.०९.२०२५ ते ३०.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवार व रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल. (२० सेवा)
01124 द्विसाप्ताहिक विशेष २८.०९.२०२५ ते ०२.१२.२०२५ पर्यंत प्रत्येक रविवार व मंगळवारी मऊ येथून ०७.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २२.२० वाजता पोहोचेल. (२० सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण जं., इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ जं., खंडवा, इटारसी जं., भोपाळ जं., बीना जं., विरांगना लक्ष्मीबाई झाशी जं., ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपुर, सूबेदारगंज, मिर्झापूर, वाराणसी जं., जौनपूर जं. आणि औड़िहार.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर कार.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (४० सेवा)
01051 द्विसाप्ताहिक विशेष २४.०९.२०२५ ते २७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवार व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल. (२० सेवा)
01052 द्विसाप्ताहिक विशेष २६.०९.२०२५ ते २९.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवार व शनिवारी बनारस येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (२० सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण जं., इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ जं., खंडवा, इटारसी जं., भोपाळ जं., बीना जं., वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं., ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपूर, सुभेदारगंज, मिर्झापूर आणि वाराणसी जं.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर कार.
४) लोकमान्य टिळक टर्मिनस – करीमनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (६ सेवा)
01067 साप्ताहिक विशेष २३.०९.२०२५ ते ०७.१०.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.३० वाजता सुटेल आणि करीमनगर येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01068 साप्ताहिक विशेष २४.०९.२०२५ ते ०८.१०.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी करीमनगर येथून १७.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण जं., इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड जं., नागर्सोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी जं., पूर्णा जं., हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आरमुर, मेटपल्ली आणि कोरुटला.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर कार.
5) पुणे – अमरावती – पुणे साप्ताहिक विशेष (१६ सेवा)
01403 साप्ताहिक विशेष ०७.१०.२०२५ ते २५.११.२०२५ पर्यंत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)
01404 साप्ताहिक विशेष ०८.१०.२०२५ ते २६.११.२०२५ पर्यंत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जं., चाळीसगाव जं., जळगाव, भुसावळ जं., मलकापूर, शेगाव, अकोला जं., मुर्तिजापूर आणि बडनेरा जं.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन.
6) पुणे – सांगानेर जं. – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (१४ सेवा)
01405 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २६.०९.२०२५ ते ०७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी पुणे येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि सांगानेर जं. येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. (७ सेवा)
01406 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष २७.०९.२०२५ ते ०८.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शनिवारी सांगानेर जं. येथून ११.३५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. (७ सेवा)
थांबे: लोणावळा (फक्त ०१४०६ साठी), कल्याण जं., भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर जं., वडोदरा जं., रतलाम जं., भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा जं. आणि सवाई माधोपुर.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन.
७) पुणे – सांगानेर जं. – पुणे द्विसाप्ताहिक विशेष (२६ सेवा)
01411 द्विसाप्ताहिक विशेष २५.०९.२०२५ ते ०६.११.२०२५ पर्यंत प्रत्येक गुरुवार व रविवारी पुणे येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि सांगानेर जं. येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. (१३ सेवा)
01412 द्विसाप्ताहिक विशेष २६.०९.२०२५ ते ०७.११.२०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवार व सोमवारी सांगानेर जं. येथून ११.३५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. (१३ सेवा)
थांबे: लोणावळा, कल्याण जं., भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर जं., वडोदरा जं., रतलाम जं., भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा जं. आणि सवाई माधोपुर.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 01017, 01123, 01051, 01067, 01411, 01403 आणि 01405 या गाड्यांचे आरक्षण १४.०९.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा.