येस न्युज मराठी नेटवर्क – पुण्यात चार महिन्यांच्या मांजरीच्या मृत्यू प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चार महिन्याच्या मांजरीचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूनंतर ज्यांची मांजर होती त्यांनी त्या मांजरीची पोस्टमार्टम केले. याच पोस्टमार्टमरिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. आणि त्या मांजरीच्या डोक्यात अवजड वस्तूचा वार बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेवर गुन्हा दाखल – पुण्यातील गोखले नगर परिसरात २ एप्रिल रोजी ही घटना घडली असून प्रशांत दत्तात्रय गाठे (वय 53) यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्राण्यांना क्रुरतेने वागविण्याच्या अधिनियमानुसार शिल्पा निळकंठ शिर्के या महिलेवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण – याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्यांनी फिर्याद दिली यांच्या घरात तीन ते चार महिने वयाचे मांजरीचे पिल्लू होते. गुढीपाडव्याच्या दिवशी फिर्यादीची पत्नी घराबाहेर रांगोळी काढत होती त्यामुळे दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजातून ते मांजरीचे पिल्लू घराबाहेर पडले आणि थेट शेजारच्या घरात गेले.त्यानंतर काही वेळातच शिल्पा शिर्के या महिलेने हे पिल्लू असं का करते म्हणून शेजार्यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी घरात जाऊन पाहिले असता मांजरीचे पिल्लू तडफडत होते. त्यानंतर काही वेळातच त्याने प्राण सोडले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर तक्रारदारांनी मांजरीचा पिल्लाचे पोस्टमार्टम केले असता डोक्यात वर्मी वार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टममध्ये उघड झाले. त्याच्यानंतर शेजारील महिलेवर हातातील काठीने मांजराच्या डोक्यावर मारून त्याला ठार मारल्याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.