सोलापूर दि. 26 (जिमाका) :- जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर यांचे कार्यालयीन शासकीय निर्लेखीत वाहन टोयोटो क्वॉलीस क्रं एम.एच.- 01 बी.ए- 1071 या विक्रीबाबत दरपत्रक दिनांक 01 नोव्हेबर 2023 रोजी सांयकाळी 04 : 00 वाजेपर्यंत कार्यालयाकडे जमा करावेत असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी केले आहे.
सदर वाहन जिल्हा समादेशक, होमगार्ड, शासकीय आय. टी. आय च्या मागे, वीजापूर रोड, सुंदरमनगर, सोलापुर येथे असुन कार्यालयीन वेळेत वाहन पहाता येईल .प्राप्त दरपत्रक दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी उघडण्यात येतील.
निर्लेखीत वाहन जसे आहे तसे या तत्वावर विक्री करावयाची आहे. लिलाव मंजुर झाल्यास लिलावाची किमत तात्काळ जमा करावी लागेल.तसेच यंत्रसामग्रीची योग्य किंमत आल्यास जिल्हा समादेशकांचे हुकुमावरुन लिलाव मंजुर करणेत येईल लिलावात यंत्रसामग्रीची किंमत कमी आल्यास लिलाव रद्द करणेचा अधिकार अध्यक्षांना राहिल आणि यंत्रसामग्रीची विक्री केल्यानंतर यंत्रसामग्री स्वखर्चाने घेऊन जावे लागेल. यंत्रसामग्रीची मुळ आर. सी बुक व वाहनाची चासी ही परिवहन विभाग यांचेकडे जमा करण्यात आली असुन सदर वाहनाची नोंदणी ही परिवहन विभाग यांचेकडुन रद्द झाली आहे त्यामुळे टोयोटो क्वॉलीस क्रं एम.एच.- 01 बी.ए- 1071 हे रस्त्यावर वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.असेही जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी कळविले आहे.