येस न्युज मराठी नेटवर्क : आधुनिक महाराष्टाचे शिल्पकार,दिवंगत उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन उजनी प्रकल्प ही सोलापूर जिल्याला त्यांनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे उजनी प्रकल्पाचे भूमिपूजन देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 7 मार्च 1966 रोजी झाले तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, कै शंकरराव चव्हाण, कै नामदेवराव जगताप, कै शंकरराव मोहिते पाटील व अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
तुझी भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याने आज तुझी चंद्रभागा अडवली आहे त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतात जा तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस अशी भावनिक प्रार्थना कै यशवंतरावांनी यावेळी आपल्या भाषणात केली होती उजनी मुळे आज सोलापूर जिल्ह्यात क्रांती होऊन हा जिल्हा साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे कै यशवंतराव चव्हाण याना विनम्र अभिवादन…