नवी दिल्ली – नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत असेल.
या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शपथविधीनंतर लगेचच उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी दुपारी १२:३० वाजता राज्यसभेतील सर्व नेत्यांसोबत बैठक घेतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांची ९ सप्टेंबर रोजी भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्याविरुद्ध ४५२ मते मिळाली. राधाकृष्णन यांनी रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला.

