प्रिसिजन वाचन अभियानाचे दुसरे पुष्प
सोलापूर – भाषेचे स्वर्गसुख घ्यायचे असेल तर वाचनाचे कर्म केले पाहिजे. वाचनाने माणसाचे आयुष्य समृद्ध होते. अशा भावना डॉ अरुणा ढेरे यांनी प्रिसिजन फाउंडेशन व इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित वाचन अभियानात व्यक्त केल्या. प्रिसिजन वाचन अभियानाचे आज दुसरे पान उघडले आणि शब्दांच्या श्रवनांनी रसिक सोलापूरकर तृप्त झाले.
एक अतिशय गुंतागुंतीचं, पण गवसलं तर आयुष्याला उजळून टाकणारं असं मैत्रीचं नातं आहे. एकाच वेळी कोमलही आणि कमालीचं कणखरही. मैत्रीचा स्पर्श स्त्री-पुरुषांना कसा होतो, त्या स्पर्शानं त्यांची आयुष्यं कशी बदलतात, घडतात, मोडतात, कसे ते विस्तारतात, समजुतदार आणि शहाणे होतात, याचा शोध आपल्या
सहजीवनजाणिवा विकसित करणारा असतो..” हे शब्द आहेत डॉ. अरुणा ढेरे यांचे. “प्रेमाकडून प्रेमाकडे” या पुस्तकातील. याच पुस्तकाचे अभिवादन केले ते ममता बोल्ली आणि हसन जैद यांनी केले.
या अभिवाचना नंतर ममता बोल्ली व जैद शेख यांना शिरीष घाटे लिखित पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ सुहासिनी शहा यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ अरुणा ढेरे व हेमकिरण पत्की यांचे ही स्वागत केले.
डॉ अरुण ढेरे यांची प्रकट मुलाखत जेष्ठ लेखक हेमकिरण पत्की यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान डॉ अरुणा ढेरे यांनी त्यांचा साहित्यिक जीवनपट उलघडला. त्या बोलताना म्हणाल्या कि सगळे काही गुण सुत्रातून येत नाही, पुस्तकांनी श्रीमंत असलेले घर मला लाभले भिंत ते छत ईतके पुस्तके होती कि भितींचा रंग माहीत नव्हता. पुस्तकांबद्दल चित्रमय आणि नादमय पद्धतीने पुस्तकांचे संस्कार माझ्या बाबांनी माझ्यावर केले. पुस्तकं आणि द्यान यज्ञ संस्कार अखंड माझ्यावर सुरू होता.
काही पुस्तके कोणत्याही वळणावर चंद्रासारखी सोबत करतात.वाचनाने जीवन दृष्टी मिळते मग ते सरधोपट राहत नाही. उत्तम लेखक हा उत्तम माणूस असलाच पाहिजे. वाचता वाचता माणूस यांत्रिक होउ शकतो.
आपण स्वैर असतो ताच्यातून एक आवड निर्माण होते. वाचनातून आपल्याला आनंदाच्या प्रति कळत जातात. वाचन हे आनंद मनोरंजन नसून वाचनाने मानवी संबंधाचा, जीवनाची गुंतागुंत समजून सांगणार सूत्र आहे.
डॉ अरुणा ढेरे यांनी मानले आभार
पुण्यामध्ये आयटी कंपन्याचे जाळे असून पण एकही कंपनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुढाकार घेत नाही पण प्रिसीजनने संस्कृतीच्या मातीशी नाते जपले आहे वाचन अभियानातून सोलापूरमध्ये समृद्ध वाचक नक्की तयार होतील त्यामुळे प्रिसिजन आणि सोलापूरकर रसिकांचे मनापासून आभार.