प्रिसिजन वाचन अभियानात ‘रूळानुबंधातुन’ उलघडणार रेल्वेची अपरिचित दुनिया
सोलापूर – प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शनिवारी, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या रूळानुबंध या पुस्तकाचं अभिवाचन आणि प्रकट मुलाखत होणार आहे. गणेश मनोहर कुलकर्णी हे रेल्वेचे ड्रायव्हर – ज्याला लोकोपायलट म्हणतात, ३०-३२ वर्षांच्या ड्रायव्हरकीच्या आयुष्यात त्यांना अनेक अनुभव आले. आपण रेल्वेचा प्रवास करताना कुठून कुठं जायचं एवढा विचार सगळेच करतात; पण एवढी मोठी गाडी एवढ्या वेगाने पळवून प्रवाशांना योग्य स्थळी पोचवणाऱ्या चालकाचा विचार कधीच मनात येत नसतो. ३०-३२ वर्षांच्या ड्रायव्हरकीच्या आयुष्यात रेल्वे रूळापलिकडचं जग वाचकांना उलगडून दाखविणारे पुस्तक म्हणजे ‘रूळानुबंध’.
प्रिसिजन वाचन अभियानमध्ये याच रूळानुबंध पुस्तकाचं अभिवाचन करणार आहेत संदीप जाधव आणि रसिका तुळजापूरकर. तसेच या कार्यक्रमात गणेश कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत सोलापूर रेल्वे विभगातील निवृत्त अधिकारी श्रीधर खेडगीकर हे घेणार आहेत.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी ६.२५ वाजता हा कार्यक्रम होईल.