सांगली ( सुधीर गोखले) – कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ढालगाव जवळील आरेवाडी येथील बिरोबा बन आता सौर ऊर्जेने उजळणार आहे नुकताच मंदिर व्यवस्थापनेने हा निर्णय घेतला असून लवकरच हा प्रकल्प बिरोबा बनात उभारला जाईल अशी माहिती मंदिर व्यवस्थापन अध्यक्ष राहुल कोळेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि काळाची पावले ओळखून आम्ही हा निर्णय घेतला राज्य शासनाच्या हरित विकास धारणेनुसार आम्ही या बनामध्ये १५ kv चा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले असून यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि मंदिरातील विद्युत पुरवठाच्या बाबतीत हे संस्थान स्वयंपूर्ण होईल. या प्रकल्पामुळे विद्युत देयकांमध्ये बचतही अपक्षीत आहे त्याचा फायदा मंदिर व्यवस्थापनात होईल सध्या महावितरणकडून येणारी लाखोंची बिले हि या प्रकल्पामुळे आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. पूर्वीच्या काळात मंदिर परिसरातील असणाऱ्या दीपमाळेच्या प्रकाशात परिसर उजळून निघत असे आता काळाच्या ओघात या दीपमाळेच्या दिव्यांची जागा विद्युत बल नी घेतली सुमारे ५० वर्षांपूर्वी या मंदिरात विद्युत पुरवठा सुरु झाला तत्कालीन सरपंच सूर्याबा कोळेकर आणि समाजाचे नेते कै शिवाजीरावबापू शेंडगे यांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्याने विद्युत पुरवठा सुरु झाला पण काळाची पावले ओळखून आणि नसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून घेण्याच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष समाधान कोळेकर, सचिव बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते तर सर्व मंदिर विश्वस्त या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत.