आयपीएल माध्यम हक्कांसाठीची बोली ४३ हजार कोटी रुपयांवर

0
20

आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचे एकूण मूल्य ई-लिलावाच्या पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. हा मूल्य २०१७ मध्ये स्टार इंडियाकडून दिल्या गेलेल्या किमतीपेक्षा २.६३ पट अधिक आहे. त्या वेळी स्टार इंडियाने १६ हजार कोटी रुपये देऊन हे प्रसारण अधिकार मिळवले होते.
रविवार हा दोनदिवसीय ई-लिलावाचा पहिला दिवस होता. आयपीएलअंतर्गत पाच वर्षांत प्रतिहंगाम ७४ सामने खेळले जाणार आहेत. शेवटच्या दोन वर्षांत सामन्यांची संख्या ९४ पर्यंत वाढवायची तरतूद आहे. या सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकार विकण्यासाठी चार विशेष पॅकेजअंतर्गत ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.