• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन

by Yes News Marathi
October 11, 2021
in इतर घडामोडी
0
महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या जूळे सोलापूरातील आरक्षित जागेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात येत असून त्याचे भुमीपूजन शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती उपमहापौर राजेश काळे यांनी दिली. जूळे सोलापूरातील वसुंधरा कॉलेज समोरील 3 हजार चौरस मीटर मोकळी जागा महानगरपालिकेने आरक्षित ठेवली होती. त्याठिकाणी उद्यान निर्मितीचा ठराव उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक अविनाश बोमड्याल यांनी मांडला होता. सभागृहात तो मंजूर झाल्यानंतर त्यास होणाज्या आर्थिक तरतुदीस एकमताने मंजूरी देण्यात आली आहे.

प्रभाग 24 चे नगरसेवक तथा उपमहापौर राजेश काळे यांच्याकडे प्रभागातील लिंगायत समाजबांधवानी मागणी केल्यानुसार सदर उद्यानास जगतज्योती महात्मा बसवेश्वर असे नाव देण्यात आले. उपमहापौरांच्या भांडवली निधीतून 20 लाख आणि मनपा कडून 20 लाख असे एकुण 40 लाख रुपयांचा निधी उद्यान विकासासाठी मंजूर झाला आहे.

सदर उद्यानात जॉगिंग पार्क, वॉकिंग ट्रॅक, बाळगोपाळांसाठी खेळणी ज्येष्ठा साठी बैठक स्थान, हिरवळ, विविध फुला फळांची झाडे लावून उद्यान विकसीत करण्यात येणार आहे. जूळे सोलापूरातील भारती विद्यापीठ ते आसरा या मुख्य रस्त्यालगत निसर्ग रम्य जागेत हे उद्यान निर्माण होत असल्याने या परिसरातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. असेही राजेश काळे यांनी सांगितले

महात्मा बसवेश्वरउद्यान विकास समिती जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी आणि भविष्यात त्यामध्ये नाविण्यपूर्ण विकास योजना राबविण्यासाठी जूळे सोलापूर परिसरातील समाज बांधवानी एकत्र येऊन उद्यान विकास समिती गठित केली आहे. यामध्ये सर्वसी विजयकुमार हत्तुरे, डॉ.बसवराज बगले, संतोष केंगनाळकर, श्रीकांत कुलकर्णी, डॉ.मल्लिकार्जुन तरनळ्ळी, प्रदिप तडकल, दयानंद भिमदे, मल्लिनाथ आकळवाडी, सकलेश बाबुळगावकर, राजेश्वरी भादुले, सुरेश स्वामी, संपदा जोशी, अनिल उपरे, परमेश्वर कलशेट्टी, शितल जालीमिंचे, डॉ.राजेश पटवर्धन, शोभा स्वामी, टी.बी. जाधव (माजी सैनिक नगर) विनया ढेकळे, संजय जम्मा, संतोष जाधव, मनोज देवकर आदींचा समावेश करण्यात आला आहे.

भविष्यात ही समिती सरकार कडून आणि विविध लोकप्रतिनिधी कडून निधी मिळवून या उद्यानात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक, विचार संपदेसाठी वाचनालय, प्रार्थना गृह, ध्यान मंदिर, शरणसाहित्य यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहे. असल्याची माहिती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
जूळे सोलापुरातील सर्व समाज बांधवाना एकत्रित करून बसव चळवळ गतिमान करण्यासाठीचे केंद्रबिंदु असणार आहे. 12 व्या शतकात जाती व्यवस्था नष्ट करून पहिल संसद स्थापन करणारे थोर संत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने उद्यान निर्मिती करण्याच्या उपमहापौर राजेश काळे यांच्या भुमिकेचे स्वागत सोलापूरातील सर्व लिंगायत बांधवानी केले आहे असे यावेळी राजशेखर हिरेहब्बु म्हणाले.

विजयादशमिच्या मुर्हतावर शुक्रवार सकाळी 11 वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाचे भूमिपूजन खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य, होटगी मठाचे डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य आणि सैफुलच्या शिवयोग धामचे शरणबसवलिंग शिवयोगी महाराज यांच्या धार्मिक अधिष्ठानाखाली होणार आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, गटनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माजी कुलगुरु इरेश स्वामी, बसवराज शास्त्री हिरेमठ, राजशेखर हिरेहब्बु, लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे, अमर पाटील, ए.जी पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ शेगावकर, शहाजी पवार, मनिष देशुख, विक्रम देशमुख, डॉ.एस.एस. पाटील, गुरुशांत धुत्त्तरगांवकर, विक्रम खेलबुडे, डॉ.जि.के देशमुख, प्रा.ए.डी जोशी, प्रा.शिवानंद शिरगांवे, आयुक्त पि.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि एन.के. पाटील, नगरअभियंता संदिप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. असेही राजेश काळे यांनी सांगितले.

Previous Post

लायन्स क्लब आयोजित शिबिरात… ११० लोकांची मोफत नेत्र तपासणी

Next Post

कै.शंकरसिंग कैय्यावाले यांच्या स्मरणार्थ नागरिकांसाठी रुग्णवाहिका

Next Post
कै.शंकरसिंग कैय्यावाले यांच्या स्मरणार्थ नागरिकांसाठी रुग्णवाहिका

कै.शंकरसिंग कैय्यावाले यांच्या स्मरणार्थ नागरिकांसाठी रुग्णवाहिका

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group