सोलापुर : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व सर्व आमदार खासदार तसेच महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, सभागृह नेते शिवानंद पाटील,विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे,गटनेते चेतन नरोटे,गटनेते किसन जाधव,गटनेते रियाज खरादी,संतोष पवार,जी एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे तसेच प्रभागातील नगरसेवक गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, ज्योति बमगोंडे, स्वाती आवळे, विजय बमगोंडे सोमपा आयुक्त,उपायुक्त प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वसंत विहार, गायत्री नगर व शिवाजीनगर भागातील रस्ते करणे कामाचा तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत वारद फार्म मडकी वस्ती व गणेश नगर केगाव येथे रस्ते काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.