बेलाटी गावातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत मुलीकरीता व मुलांकरीता स्वच्छतागृहाची आवश्यक्यता होती. सध्या असलेले स्वच्छतागृह शाळेच्या मागिल बाजूस व जुने झालेले असल्याने शाळेतील शिक्षकांनी बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस.आर अंर्तगत मुलांकरीता व मुलीकरीता एक नविन स्वच्छतागृहाचे युनिट बांधून मिळावे अशी मागणी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांचे कडे केली. बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळानी स्वच्छतागृहाच्या बांधकामास प्राधान्य देत या कामास त्वरीत मंजुरी दिली.
आज बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार श्री मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते नारळ वढवून स्वच्छतागृहाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रिया सुरवसे यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळ व व्यवस्थापकिय संचालक श्री राम रेडडी यांनी स्वच्छतागृहाचे बांधकामास मंजुरी देऊन त्याचे काम लवकर सुरू केल्यामुळे सर्वांचे आभार मानले .
या कार्यक्रमास बेलाटी ग्रामपंचायत उपसरपंच प्रभू राठोड , केंन्द्रप्रमुख श्री डी राठोड, शालेय समिती अध्यक्ष सौ शकुंतला माशाळ, उपाध्यक्ष परमेश्वर थोरात, सदस्य श्रीकांत गायकवाड, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, प्रशांत पोल्लूर, शिक्षक राहूल राठोड, प्रिया सुरवसे, थिटे सर, जंगाले मॅडम, घुगे सर, व बेलाटी गावातील नागरीक, पालक, विदयार्थी उपस्थित होते.