सोलापूर : अर्थसंकल्प आणि जिल्हा व इतर मार्ग योजनेतून भंडारकवठे- माळकवठे- औज मं. या दीड कोटी रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिणच्या सभापती सोनाली कडते यांची उपस्थिती असणार आहे.
आ. सुभाष देशमुख यांनी अर्थसंकल्प व जिल्हा व इतर योजनेतून दीड कोटीच्या भंडारकवठे- माळकवठे- औज मं. या रस्त्याला मंजुरी मिळवली होती. त्याचे भूमिपूजन औज येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जि.प.चे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, जि.प. सदस्या प्रभावती पाटील, उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, पं.स. सदस्य संदीप टेळे, महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, ताराबाई पाटील, रेखा नवगिरे, रकमाबाई चन्ने आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.