वैजापूर : करंजगाव जवळ नागपूर – मुंबई महामार्गावर २५ जुलै रविवारी रात्री औरंगाबादहून – मुंबईकडे बियरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकसोबत कंटेनर घासला होता. या अपघातात कंटेनरची एक बाजू घासली गेली आणि पत्रा फाटल्याने बियरचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. यावेळी येथील नागरिकांनी काही क्षणात कंटेनर रिकामा केला. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच जमावाने बियरचे तब्बल १६५० बॉक्स लांबवल्याचा प्रकार समोर आला. यावेळी कोणीही अपघातग्रस्त कंटेनरच्या जखमी चालकाकडे लक्ष दिले नाही.
मात्र त्याचवेळी तेथून जाणाऱ्या काही प्रवाशांनी संवेदनशीलता दाखवत जखमी कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि घटनेची माहिती पोलिसांना कळविली.नागरिकांनी पळवले तब्बल १६५० बियर बॉक्सऔरंगाबादहून मुंबईकडे जात होता कंटेनर -औरंगाबादहून – मुंबईकडे बियरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा २५ जुलैच्या रात्री वैजापूर तालुक्यातील करंजगाव जवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकसोबत कंटेनर घासला होता. या अपघातात कंटेनरची एक बाजू घासली गेली आणि पत्रा फाटल्याने बियरचे बॉक्स रस्त्यावर पडले होते.क्षणात रिकामा झाला कंटेनर -अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस येण्यापूर्वीच रस्त्यावर पडलेले बियरचे बॉक्स स्थानिक नाकरिकांनी पळवले. अपघातग्रस्त कंटेनरमधील बियरचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवर मावतली तेवढे बॉक्स घेऊन पळ काढतांना दिसत होते. कंटेनरमध्ये जवळपास १८०० बियरचे बॉक्स होते त्यापैकी १६५० बियर बॉक्स लोकांनी लांबवल्याचा समोर आले आहे. लोकांनी हातात बसतील तितके बॉक्स घेऊन पळ काढला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात कंटेनर रिकामा झाल्याचे पाहायला मिळाले.लुटमार करताना जखमी चालकाकडे दुर्लक्ष -कंटेनरला अपघात झाल्याने चालक जखमी झाला होता. मात्र तिथे जमलेल्या लोकांनी चालकाकडे दुर्लक्ष करत बियर बॉक्स नेण्याला प्राधान्य दिले होते. कोणीही जखमी चालकाला रुग्णालयात नेले नाही.