सोलापूर : कृषी, वैद्यकीय, विधी, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या गुणीजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याने बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले.
आज रविवार रोजी सोलापुरातील
टाकळीकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप माने बोलत होते. बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसेकर अध्यक्षस्थानी होते. बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, ॲड सोमनाथ वैद्य, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैलमामा हत्तूरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, मल्हार ब्रिगेड सचिन सोनटक्के, शिंदे गट सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतूबर, शाम दुरी, धर्मराज पुजारी, जुबेर बागवान, खलिफभाई शेख, ॲड विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक संघाचे सदाशिव व्हनमाने, विठ्ठल व्हनमोरे, बाजीराव बुळगुंडे, शंकर कांबळे, नागनाथ कांबळे, सिदराया मावीनमर, हरिभाऊ गुजरे, सवेश्वर बुरकूल, जतीन निमगाव, ॲड विनयकुमार कटारे, दत्ता केरे, विनायक साळुंखे, डाॅ. वैचीनाथ कुंभार, रमेश धुरपे, कल्लप्पा पाटील, जयश्री सुतार, सरपंच सुजाता सुतार आदींची उपस्थिती होती. प्रारंभी बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
माजी आमदार दिलीप माने म्हणाले की, बसव ब्रिगेड आणि सोनाई फौंडेशन या सामाजिक संस्थेकडून समाजातील योग्य व्यक्तींचा बसवरत्न पुरस्काराने करण्यात आला असून हा सन्मान देतांना अभ्यासपूर्वक नावे निवडलात. योग्य व्यक्तींचा सत्कार करण्याचा भाग्य मला मिळाला. विधायक कामे करणाऱ्यांच्या सोबत मी नेहमीच असणार आहे.
संतोष पवार म्हणाले की, समाजातील गुणवंताचा हा गौरव सामाजिक संस्थेकडून होत आहे. हे प्रेरणादायी असे काम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बसव भवनसाठी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
समाजासाठी झटणाऱ्यांच्या पाठीमागे भविष्यातही आम्ही खंबीरपणे उभारणार असल्याचे सत्कार युवराज राठोड यांनी सांगितले. बसव भवनच्य इमारतीच्या उभारणीसाठी नेहमी सकारात्मक राहणार असून यासाठी भविष्य काळात होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून देखील मंत्रालयीन स्तरावरुन प्रयत्न करण्याचे अभिवचन सोमनाथ वैद्य यांनी दिले. प्रास्ताविकेत अमित रोडगे यांनी बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती विशद केले. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.
यांचा झाला बसवरत्न पुरस्काराने सन्मान
डाॅ. अमरनाथ सोलपुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला जगत अनिता माळगे, अध्यात्मिक रवि बिराजदार, उद्योग मल्लिनाथ आकळवेढे, वैद्यकीय डाॅ. प्रतिभा पाटील, सामाजिक रोहित पाटील, शैक्षणिक वैशाली शहापूरे, कृषी शशीकांत पुदे, विधी विश्वनाथ पाटील
स्वयं शिक्षा फौंडेशनकडून विधायक कामे
जगदगुरू डाॅ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि बसवारूढ मठाचे मठाधिपती
शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते
गुरुपौर्णिमेनिमित्त ५१ हजार लाडू वाटप
जेष्ठ नागरिकांना १० हजार छत्र्यांचा वाटप
५ हजार तरूणांना टी शर्ट वाटप