येस न्युज नेटवर्क : आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप देण्यात येत असून साधारणपणे सायंकाळी चार वाजल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात होईल. कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी सर्वच महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच विसर्जन होत आहे. यासाठी ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे.