• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बँक ऑफ बडोदाने दिली बचत गटातील महिलांना नवी ‘उमेद’

by Yes News Marathi
January 30, 2021
in इतर घडामोडी
0
बँक ऑफ बडोदाने दिली बचत गटातील महिलांना नवी ‘उमेद’
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर प्रतिनिधी /समाधान रोकडे : उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेद अभियानातंर्गत बँक ऑफ बडोदा वडाळा शाखेने महिला बचत गटांना 82 लाख रुपये कर्ज देऊन महिलांना नवी उमेद दिली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात महिलांची बचत गटांच्या चळवळ तळागाळा पर्यंत पोहचत आहे. यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेद अभियान अंतर्गत सुरुवातीला दर आठवडा दहा-वीस रुपयांची बचत सध्या महिलांसाठी मोठा आधार बनली आहे.

सध्या महिलांसाठी पशुपालन ,शेती , विविध मसाले बनविणे , हस्तकला वस्तू , पापड उद्योग, कापड दुकान आदी विविध व्यवसाय करण्यासाठी रानमसले, वडाळा, दारफळ (गा.), वांगी येथील 67 महिला बचत गटांना 82 लाख कर्ज देऊन महिलांना नवी उमेद दिली आहे. रानमसले (ता.उ. सोलापूर) येथील 25 महिला बचत गटांना 25 लाख रूपयांचे चेक चे वाटप बँक ऑफ बडोदाचे वडाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक विवेक बावीस्कर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बावीस्कर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले “बचत गटांनी आपले कर्ज वेळेत परतफेड करुन आपली पत राखावी.कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या महिला बचतगटांनाच यापुढे कर्ज वाटप करण्यात येईल.यासाठी आपआपल्या उद्योग – व्यवसायात प्रगती करुन आर्थिक विकास साधावा” असे आवाहन केले. यावेळी बँक सखी सारिका साठे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

रानमसले येथील बचत गटांना कर्ज वाटप करण्यासाठी रोहिणी कुंभार , सोनम गजघाटे यांनी परिश्रम घेतले यावेळी महिला बचत गटातील रत्नमाला शिंदे ,महानंदा गरड , विद्या गरड ,कविता कुंभार, सरस्वती गरड, लताबाई गरड, लता शेरखाने, वर्षा वाघमारे, जया गरड, शितल वाघमारे ,अर्चना गरड ,शामल गोरे , सुरेखा गरड , शुभांगी पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या .

Previous Post

१ मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार

Next Post

उद्या पोलिओ लसीकरण मोहीम,जिल्ह्यातील चार लाख ५२ हजार ७३९ बालकांना लसीकरण

Next Post
उद्या पोलिओ लसीकरण मोहीम,जिल्ह्यातील चार लाख ५२ हजार ७३९ बालकांना लसीकरण

उद्या पोलिओ लसीकरण मोहीम,जिल्ह्यातील चार लाख ५२ हजार ७३९ बालकांना लसीकरण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group