महानगर पालिका विषेश स्वच्छता मोहिम २ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२४ स्वच्छता अभियान अंतर्गत सोलापूर शहरातील ७९ रस्ते स्वच्छता मोहिम सुरू आहे.
बालाजी अमाईन्स लि व बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि या कंपनी मधिल ८० कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी या मोहिमेत सहाभाग घेत आसरा चौक ते महावीर चौक, होटगी रोड, परिसरात सकाळी ८ वाजता असरा चौका पासून सुरवात करत महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियान २०२४ मोहिमेत उ त्स्फूर्तपणे सहभागी होऊन साफ सफाई करत या अभियानात भाग घेत संपुर्ण परिसर सकाळी 8.00ते 10.30 वाजेपर्यंत परिसरातील कचरा उचलून श्रमदानाने पुर्ण होटगी रस्ता स्वच्छ केला.
- “स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येकानी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता या अभियानात भाग घेऊन महानगर पालिकेच्या कर्मचारी वर्गास साथ दयावी तसेच स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या कार्मचारी वर्गाची नसून आपणा सर्वांची आहे”. बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी याप्रसंगी सर्वाना मार्गदर्शन केले. या कार्यकमात महानगर पालिकेचे अतिरिक्त अयुक्त श्री रवी पवार यांचा व सह आयुक्त श्र शशिकांत भोसले यांचा सत्कार बालाजी अमाईन्सचे श्री अरुण मासाळ (महाव्यवस्थापक वित्त) व वर्षा गुंटूक(एच. आर. मॅनेजर) यांच्या हस्ते एक रोप देऊन सत्कार करण्यात आला.
- या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, विभागिय अधिकारी बाबर साहेब, पालिकेचे पी आर ओ श्रीगणेश बिराजदार, आरोग्य निरिक्षक नागनाथ मेंडगुळे, अनिल चराटे, महेश जाधव , बालाजी सरोवरचे मॅनेजर ब्रिजेश सिंह, महांतेश तोळणूर, बालाजी अमाईन्सचे अरुण मासाळ, वर्षा गुंटूक, असिफ कोतवाल, अजित जोडभावी, सुनिल गज्जम, जयंत बासुतकर गणेश धुमाळ, सिध्दाराम आहेरवाडी, दत्तप्रसाद सांजेकर , बालाजी ग्रुपचे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.