भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्ष प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, पंढरपूर येथे वारकरी प्रतिष्ठान यांचे माध्यमातून तुळशी अर्चना व श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ह भ प सुधाकर इंगळे महाराज हे कथाकार असून दररोज स. भजन, दु. 2.00 वा. श्रीमदभागवत कथा व रात्री कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात ह भ प भागवत चवरे महाराज (पंढरपूर), ह भ प श्रीरंग औसेकर महाराज, ह भ प तानाजी बेलेराव यांच्या हस्ते ग्रंथ व वीणा पूजन करून करण्यात आली.
” तुका म्हणे येथे भजन प्रमाण | “
या न्यायाने दररोज वेगवेगळ्या भजनी मंडळचे भजनाने प्रारंभ झाला असून त्यामध्ये श्री सदगुरु सुधाकर इंगळे महाराज सेवा समितीच्या वतीने पुरस्कार वितरण केले गेले. “वारकरी सेवा भूषण” या पुरस्काराने संजय पाटील महाराज व संतोष कवडे (सर) यांना सन्मानित केले. तसेच कौशिक तात्या गायकवाड यांना ” समाज गौरव ” पुरस्काराने सन्मानित केले. समाजातील सेवाभावी व्यक्तीचा सन्मान हा इतरांच्या साठी प्रेरणादायी ठरते म्हणून पुरस्कार देण्याचा संकल्प केला असे विचार तुकाराम भोसले महाराज यांनी आपल्या मनोगता मध्ये मांडले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सभामंडप, पंढरपूर येथे पुरस्कृत केल्यामुळे जीवन सफल झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी माधव महाराज नामदास (संत नामदेव महाराज 16 वे वंशज), राजेंद्र शेळके साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी), शिवाजी महाराज (नारायणगड ), प्रसाद महाराज अंमळणेरकर , नामदेव शास्त्री सानप महाराज ( भगवानगड ), जोतिराम चांगभले, इ. अधिकारी व महंत विभूतीनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम भोसले महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष विश्व वारकरी सेना), पुरुषोत्तम सुरवसे महाराज, आदर्श इंगळे महाराज यांनी वारकरी प्रतिष्ठानच्या वतीने केले होते. या सोहळ्यासाठी महिला व पुरुष भाविकाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती .