सोलापूर : औरंगाबादकर सराफी पेढीच्या मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ आज प्रमुख अतिथी प्रशासकीय सेवेतल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. मनिषा आव्हाळे जि.प. सोलापूर तसेच मंडल अधिकारी, कारंबा रोड, सोलापूर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सारिका वाव्हळ-पतंगे आणि उद्योजक सौ. ओजस्विनी सिध्दार्थ सालक्की व मा. सिध्दार्थ इरप्पा सालक्की यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
१७७ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफ™ यांच्या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ आज हॉटेल ऐश्वर्या सोलापूर येथे झाला.
याप्रसंगी बोलताना़ “परंपरेमध्ये आधुनिकता आणि नव्या पिढीचाही सुरुवातीपासूनचा समावेश करून घेतल्यामुळे हा व्यवसाय अनेक दशकं टिकवून नव्हेच वाढतच राहिलाय , आणि औरंगाबादकर सराफांनी काळाच्या बरोबर म्हणण्यापेक्षाअगोदरच नव नव्या संकल्पनेला कृतीत आणि व्यवहारात आणले ” असे मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.
औरंगाबादकर सराफी पेढी ही सोलापुरातील सर्वात जुनी ख्यातनाम आणि विश्वासार्ह पेढी असून, सचोटीद्वारेच पेढीने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. सातत्याने गेली २० वर्षे भरावल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाची सोलापूरकर नेहमीच वाट बघत असतात. दरवेळी काही तरी नवीन देण्याचा मानस ठेऊन, यावेळी सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या मराठमोळ्या मोत्यांच्या दागिन्यांना प्राधान्याने उप्लब्ध केले आहे.
अस्सल मोती आणि रत्ने म्हणलं की, ग्राहकांच्या तोंडी नाव येतं ते औरंगाबादकर सराफांचंच.
पारंपारिक मराठ मोळे दागिन्यांत यावेळी वज्रटिक, चिंचपेटी ,मोत्याचा लफ्फा, तन्मणी, पेंड, बाजीराव नथ, पारंपरिक नथ, बानू नथ ,वेल झुब्बा शबाना, कॉलर, रामराज तोडे, कंगन, फुलतोडा, राणीहार ,चोकर,साज,पुतळी हार, ठुशी,गरसोळी, मोत्यांच्या कुड्या, बुगडी, वाकी, बाजूबंद आदी व्हरायटी उपलब्ध आहेत. फ्रेश वॉटर सी वॉटर सेमी प्रेशियस 925 सिल्वर ज्वेलरी पण उपलब्ध आहे.
काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार नव्या डिझाइनचे दागिने सुद्धा इथे उपलब्ध करून देत आहेत. हे प्रदर्शन 30 जानेवारी पर्यंत हॉटेल ऐश्वर्या येथे सर्वांसाठी खुले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वैद्य चे रणजीत विश्वरूपे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय औरंगाबादकर यांनी केले या कार्यक्रमात श्रीकांत कुलकर्णी संदीप पंढरपूरकर संतोष दिवाण प्रमोद तम्मनवर , रवी हलासगीकर आदी बी बी एन परिवार उपस्थित होता.