सोलापूर शहरातील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे सोलापूर महापालिकेची इंद्रभवन ही वास्तू. गेल्या शंभर वर्षातील अनेक ऐतिहासिक घटनांची ही इमारत साक्षीदार बनली आहे सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 26 जानेवारी पासून महापालिका आयुक्तांसह सर्व प्रशासकीय कारभार पुन्हा या इमारतीत येणार आहे .शिवाय नागरिकांना देखील या इमारतीचे सौंदर्य न्याहाळता यावे म्हणून माहिती फलक तसेच फोटोग्राफ देखील लावण्यात येणार आहेत .सध्या आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू असल्यामुळे या इमारतीला चार चांद लागल्याचे दिसून येते