सोलापूर : लॉजवर वादाचे रूपांतर हाणामारी आणि नंतर जातीवाचक शिवीगाळीत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर मनोहर सपाटे व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर सपाटे यांच्यावर दुसऱ्यांदा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे हा फरार झाला आहे. यातील फिर्यादी किरण साळवे हे शिव-पार्वती लॉजवर मॅनेजर आहेत, 13 ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान शिवपार्वती लॉज मध्ये आलेल्या प्रवाशावरून किरण साळवे व बाबासाहेब सपाटे यांच्यात वाद झाला, त्या वादाचे रूपांतर हाणामारी झाले त्याच वेळी बाबासाहेब सपाटे यांनी साळवे याला जातीवाचक शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर किरण साळवे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब सपाटे त्याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवला त्याचबरोबर या गुन्ह्यात मनोहर सपाटे यांचेही नाव त्याने घेतले आहे.
शुक्रवारी फौजदार चावडी पोलिसांनी मनोहर सपाटे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले होते सपाटे यांना अटक केल्याचे समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक विनोद भोसले, काँग्रेस युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माऊली पवार माजी उपमहापौर दिलीप कोल्हे सह मराठा समाजातील नेते तसेच सपाटे समर्थकांची गर्दी झाली होती, या सर्वांनी सहाय्यक पोलीस आयुक्त रेड्डी तसेच पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची भेट घेतली मात्र ॲट्रॉसिटीचा गुन्हा असल्याने त्यांना काहीही करता आले नाही. सपाटे यांना पोलिसांनी न्यायालयासमोर नेले आहे.
दरम्यान अधिक माहिती घेतली असता गुरुवारी पहाटे या मारहाणीची माहिती सपाटे यांना मिळताच त्यांनी दोघांचे भांडण सोडवले, सकाळी आपण बघूत असे सांगितले असता साळवे यांनी थेट दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला यामध्ये खरा वाद हा साळवे व बाबासाहेब सपाटे या दोघात झाला होता उलट मनोहर सपाटे आणि किरण साळवे यांचे संबंध चांगले होते त्याने असे का केले? अशी चर्चा फौजदार चावडी पोलीस ठाणे परिसरात सपाटेंच्या समर्थकांकडून ऐकण्यास मिळाली.