सोलापूर : शहरातील फूटपाथवर राहणारे भिक्षुक, गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारे, वंचित, गरजू, गरीब व्यक्ती या सणाच्या आनंदापासून वंचित राहतात. या लोकांना दीपावलीचा आनंदही अनुभवता यावा यासाठी ‘अॅटलान्स’ने गरिबांना मोफत कपडे देण्याचे काम केले आहे. या कामासाठी ‘अॅटलान्स’चे सुबोध भुतडा व त्यांच्या परिवाराने परिश्रम घेतले.
दरम्यान, रेडिमेड गारमेंट रिटेलर्समध्ये सोलापूरमधील ‘ॲटलान्स’चे नाव आदरानं घेतलं जातं. रेडिमेड गारमेंट किरकोळ विक्रेते, शू डीलर्स, रेडिमेडसाठी देखील ‘अॅटलान्स’ला ओळखले जाते. दिवाळी खरेदीसाठी सोलापूरकरांची पहिली’ पसंत ‘अॅटलान्स’ आहे. दिवाळीनिमित्त ‘ॲटलान्स’ने कपड्यांचा नवा स्टॉक’अॅटलान्स’मध्ये मोठी गर्दी होत आहे. सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून दोन ते तीन दिवसांपासून ‘अॅटलान्स’चे कर्मचारी शहरातील फूटपाथवरील गोरगरिबांचे माप घेऊन त्यांच्या मापाचे कपडे शिवून तयार झालेले कपडे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.
दिवाळी रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळावे, लखलखत्या तेजोमय पणती प्रकाशाप्रमाणे या बालगोपाळांच्याही जीवनात ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात एक अनमोल आठवण ठरावी व या आठवणीने त्यांचे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे या उद्देशाला डोळ्यासमोर ठेवूनच हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ‘ॲटलान्स’चे सुबोध भुतडा यांनी सांगितले.