अक्कलकोट मतदारसंघातील जेऊरवाडी येथे सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला उपस्थित राहून गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली तसेच भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून मतदानरूपी आशीर्वाद मागितला. गेल्या 5 वर्षांतील तालुक्याच्या आणि गावाच्या विकासाच्या जोरावर पुन्हा मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्याचं आवाहन कल्याणशेट्टी यांनी केले.
याप्रसंगी विलास गव्हाणे,. महिबुब मुल्ला, विलास राठोड, कमलाबाई राठोड, सुभाष चव्हाण, संजय राठोड, संदीप राठोड, देविदास राठोड, टोपू महाराज, शिवलाल राठोड, गुणाबाई चव्हाण, रामेश्वर राठोड आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदेवाडी खुर्द येथील गावाला भेट
आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी आंदेवाडी खुर्द येथील गावाला भेट दिली. ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. आंदेवाडीत केलेल्या आणि नजिकच्या भविष्यात होणाऱ्या विकास कामांची महिती दिली.
गेल्या 5 वर्षात आंदेवाडी खुर्दमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोली बांधण्यात आली. श्री वीरबद्रेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधण्याचे काम सुरू आहे. आंदेवाडी ते पान मंगरूळ रस्त्याच्या सुधारणेचे काम झाले आहे. मुस्लिम वस्तीत समाज मंदीर बांधणे, श्री बमलिंगेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे आणि जलजीवन मिशनमध्ये गावात नळाव्दारे पाणी पुरवठा करणे अशा कामांना निधीसह मंजुरी मिळाली आहे.
यावेळी परमेश्वर यादवाड, डॉ.अशोक हीप्पर्गी, महादेव मुडवे, शिवानंद मानशेट्टी, अंबादास नशेवाले, यलप्पा कामठी, चंद्रशेखर कामठी, सुरेश कामठी, ज्ञानेद्र कामठी, सिद्राम कामठी, धानप्पा कामठी, गंगाधर कामठी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.