• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांवर गुन्हा दाखल

by Yes News Marathi
July 31, 2021
in इतर घडामोडी
0
आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांवर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुवाहाटीः ईशान्येतील दोन राज्यांमधील वाद वाढत चालला आहे. काही दिवासांपूर्वी आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर हिंसाचाराची घटना घडली. यावेळी झालेल्या गोळीबारात आसामचे ६ पोलिस कर्मचारी शहीद झाले. यानंतर आता मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. याशिवाय आसामचे ४ वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासनातील २ अधिकाऱ्यांसह २०० अज्ञात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिझोराम पोलिसांनी सर्वांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक जॉन नेहलिया यांनी दिली. मिझोराम पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगटे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.आसामच्या ज्या पोलिसांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यात पोलिस महानिरीक्षक अनुराग अग्रवाल, पोलिस उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी, कछारचे पोलिस अधीक्षक चंद्रकांत निंबाळकर आणि ढोलाई पोलिस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दीन यांचा समावेश आहे. कछारचे उपायुक्त किर्ती जल्ली आणि कछारचे विभागीय वनअधिकारी सनीदेव चौधरी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नेहलिया यांनी दिली.आसाम आणि मिझोराममध्ये सीमेवरून वाद आहे. यावरून सोमवारी दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात आसामचे ६ पोलिस शहीद झाले. या घटनेवरून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर हिंसा भडकवल्याचा आरोप केला आहे.

Previous Post

फासावर जाण्याची तालीम सुरु असताना झाली चूक

Next Post

आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

Next Post
आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group