सोलापूरकरांनी या पावसाळ्याच्या सिझनमध्ये प्रथमच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट ऐकला. दुपारी सव्वा तीन वाजता पाऊस सुरू झाला. पाऊण तासात या पावसाने सोलापूरकरांची चांगलीच धुलाई केली. 38.6 मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
या पावसामुळे नेहमीच्या प्रमाणे चौपाड, भागवत थिएटर, गणेश पेठ शॉपिंग सेंटर, हरीभाई देवकरण प्रशाला, निराळे वस्ती, होडगी रोडवरील तरुण भारत समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. सोलापूर महापालिकेची नव्याने टाकलेली ड्रेनेज लाईन देखील अपुरी असल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अशा मोठ्या पावसाने सोलापूरकरांची दाणा दान होते शिवाय अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचते. पहा सोलापुरात बुधवारी पावसाने केलेली ही तुफान बॅटिंग