सोलापूर, दि.20: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी कामवाटप समितीमार्फत देण्यात येणाऱ्या कामकाजासाठी 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ या कार्यालयातील स्वच्छतेचे अडीच लाख रूपयांचे कामकाज, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, मोहोळ या कार्यालयातील स्वच्छतेचे अडीच लाख रूपयांचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगोला या कार्यालयातील स्वच्छतेचे 96 हजार रूपयांचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर या कार्यालयातील स्वच्छतेचे अडीच लाख रूपयांचे काम, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलींचे सोलापूर या कार्यालयातील स्वच्छतेचे एक लाख 10 हजार रुपयांचे काम.
ही कामे 11 महिन्यासाठी कामवाटप समितीतर्फे बेरोजगारांच्या सेवा सोसायटीस देण्यात येणार आहेत. सोसायट्यांचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील किंवा शहरातील आहे, अशा पात्र व इच्छुक सेवा संस्थांनी कामकाजासाठीचे प्रस्ताव 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर या कार्यालयास सादर करावेत.
अधिक माहितीसाठी इमेल- [email protected] आणि दूरध्वनी क्रं. 0217-2622113 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.