सोलापूर: आरोपी : अनमोल अनिल केवटे, वय ३२ वर्षे, रा. मु. पो. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर याचेविरुध्द सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणीची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ७६१/२०२४ दि.२०/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, अनमोल अनिल केवटे, वय-३२ वर्षे, रा. मु.पो. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.२३/०३/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर झळकी, ता. इंडी, जि. विजयपुर येथे सोडण्यात आलेले आहे.