सोलापूर : न्यू हायस्कूल सलगर वाडी येथे मोठ्या उत्साहात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर श्री. राहुल आमले, प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट आरती बंडी ,सेक्रेटरी रंजना शिरसट यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक चव्हाण सर होते. तसेच सौ. उज्वलाताई शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयवंत हाक्के सर व शाळेचे पर्यवेक्षक श्री. अशोक म्हमाणे व्यासपीठावर उपस्थित होते. श्री कार्तिक चव्हाण सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांच्या सहकार्याने शाळेचा विकास होत असून आणखी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नंदकुमार व्हनमोरे, मनोगत राहुल पोटफोडे सर , आभार प्रदर्शन सौ. सुजाता बिराजदार मॅडम व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश तांबुळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. षण्मुखानंद दाते, सौ. सुजाता बिराजदार ,श्री. राहुल पोटफोडे, श्री. वाघमारे सर, संतोष जाधव व दिलीप राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले