येस न्युज मराठी नेटवर्क । आघाडीचं सर्च इंजिन ‘याहू’ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात सर्वाधिक सर्च (Yahoo’s Most Searched Personality List for 2020) करण्यात आलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, 2020 मध्ये नेटकऱ्यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केलं, तर त्याची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वाधिक सर्च करण्यात आलेली महिला सेलिब्रिटी ठरली आहे.
- मंगळवारी याहूने सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत सुशांतसिंग राजपूतशिवाय अनेक राजकिय नेत्यांचाही समावेश आहे.
- २०१७ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाहीयेत.
- यावर्षी पंतप्रधान मोदी दुसऱ्या स्थानावर राहिलेत, तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे.
- Yahoo’s Most Searched Personality List for 2020 च्या यादीत रियानंतर अनुक्रमे चौथ्या क्रमांकावर राहुल गांधी, पाचव्या क्रमांकावर अमित शाह, सहाव्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, सातव्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल, आठव्या क्रमांकावर ममता बॅनर्जी, नवव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आणि दहाव्या क्रमांकावर कंगना राणावत यांचा क्रमांक लागतो.
- सुशांत ‘मोस्ट सर्च मेल सेलिब्रिटी’च्या श्रेणीतही पहिल्या क्रमांकावर आहे. ‘मोस्ट सर्च मेल सेलिब्रिटी’च्या यादीत सुशांतनंतर अनुक्रमे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषि कपूर यांची नावं आहेत.
- तर, रिया या वर्षीच्या ‘मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी’च्या श्रेणीत पहिल्या नंबरवर आहे. त्यानंतर अनुक्रमे कंगना राणावत, दीपिका पादुकोण, सनी लिओनी आणि प्रियंका चोप्रा यांची नावं यादीमध्ये आहेत. वर्ष 2020 च्या ‘टॉप न्यूजमेकर्स’ च्या श्रेणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर राहिलेत. तर, सुशांत आणि रिया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांचा तिसरा क्रमांक आहे.