सोलापूर: स्व.डॉ. मालती दोशी (कोल्हापूर) यांच्या स्मरणार्थ अॅड.डी. एम. दोशी फाउंडेशन, मुंबई यांच्या कडून आधार विश्वस्त संस्थेला मारुती इको व्हॅन ॲम्बुलन्स भेट देण्यात आली आहे.आज रोजी या व्हॅनचा हस्तांतरण सोहळा आधार केअर सेंटर भोगाव येथे पार पडला.
डॉ मालती दोशी यांनी इस वी सन १९५५ च्या सुमारास ताराचंद रामनाथ मेडिकल कॉलेज, पुणे येथून आपली वैद्यकीय पदवी पूर्ण केली. त्या काळी एखाद्या स्त्रीने इतके शिकणे दुरापस्त होते. त्यातही वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या पदवीदान समारंभात अस्खलित, शुद्ध संस्कृत भाषेतून भाषण केले होते, कोल्हापूर जवळच्या वळीवडे सारख्या खेड्यात स्वतःचे gynaecology हॉस्पिटल काढले आणि परिसरात डॉक्टर म्हणून नाव कमावले. फॅमिली प्लॅनिंग ची सर्वाधिक ऑपेरेशनस त्यांनी केले . आधार विश्वस्त संस्थेला डॉ मालती दोशी यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका भेट देण्यास विजयकुमार दोशी यांनी पुढाकार घेतला आणि डॉ. मालती दोशी यांच्या इच्छेला मूर्त रूप आले. असे ऋजुता दोशी यांनी आपल्या प्रमुख अतिथी म्हणून भाषणात सांगितले.
आधार चे सचिव प्रतिक शिवगुंडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. नवनीत तोष्णीवाल यांचे आभार मानले कारण त्यांच्या पुढाकाराने हि व्हॅन आधार संस्थेला मिळू शकली. त्यांनी अॅड.डी. एम. दोशी फाउंडेशन च्या संचालकांचे आभार मानले व सांगितले कि या व्हॅनमुळे आधार च्या रुग्णांना तातडीची सेवा पुरविण्यासाठी संस्था आता सक्षम झाली.
या कार्यक्रमाला डॉ पल्लवी मेहता, कमल मेहता, दीपिका अनुपम शहा, ऋजुता राजेश दोशी अॅड.डी. एम. दोशी फाउंडेशन च्या आदी मान्यवर उपस्थित होते आधार चे डॉ. प्रतिक शिवगुंडे . मयुरी शिवगुंडे व शजय नारायणजि भुतडा ही उपस्थित होते.गाडीचे पूजन कमल सुभाष मेहता यांचे हस्ते झाले जयनारायणजि भुतडा यांनी आधार च्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.